बंदुकीचा धाक दाखवत त्याने केला बलात्कार; ‘मॅसेंजर ऑफ गॉड’ ते बलात्कारी बाबा

baba ram rahime vedict resize

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमित राम रहीम सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्यात पंचकुला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर मोठ्याप्रमाणावर पंजाब आणि हरियाणामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. राम रहीम यांच्या समर्थकांनी पंजाब मध्ये दगडफेक सुरु केली असून समर्थक आक्रमक झाले आहेत. अनेक गाड्या घरे अक्षरश पेटवून देण्यात आली आहेत. मात्र ज्या बाबासाठी त्याचे समर्थक हे सर्व करतायत तो बाबा आहे तरी कोण हे जाणून घेऊयात.panchkul hinsachar

समाजसेवा ते चित्रपटामध्येही बाबा चांगलाच सक्रीय आहे. मध्यंतरी ‘मॅसेंजर ऑफ गॉड’ हा चित्रपट बाबा राम रहीमने स्वत बनवला आणि हिरो म्हणून काम हि केल. 1967 मध्ये राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये जाट शिख कुटुंबात जन्मलेल्या बाबा राम रहीमला तत्कालीन डेरा प्रमुख सतनाम सिंह यांनी 23 सप्टेंबर 1990 मध्ये आपला वारसदार घोषित केलं. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी बाबा राह रहीम डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बनला. यानंतर बाबा राम रहीम यांच्या नेतृत्त्वात खऱ्या अर्थाने डेरा सच्चा सौदाची लोकप्रियता वाढू लागली.

baba ram rahim

बाबा राम रहीमचा डेरा सच्चा सौदा सामाजिक एकोपा, नशामुक्ती आणि मानवसेवेपासून सर्वधर्म समभावचा संदेश देताण्याच काम करत असल्याचा दावा त्याचे समर्थक करतात. मात्र आजचे चित्र पाहता काहीतरी वेगळच घडत असल्याच दिसून येत आहे. डेरा सच्चा सौदाची धुरा बाबांनी सभाळल्या पासून अनुयायांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढच होत गेली.baba ram rahim aashram

२००२ साली बाबा राम रहिमवर त्याच्याच आश्रमातील एका साध्वीने बलात्काराचा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. साध्वीने आपल्यावरील अन्यायाची थेट पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना एक चिठ्ठीही लिहिली होती. एका स्थानिक दैनिकाने या पीडीत मुलीची चिठ्ठी छापताच हे बलात्कार प्रकरण चव्हाट्यावर आलं. हे प्रकरण दडपण्यासाठी बाबा रहीमच्या समर्थकांनी या पीडित साध्वीचा भाऊ आणि ती चिठ्ठी छापलेल्या दैनिकाच्या संपादकीचीही हत्या केली.

poora sach newspaper

बंदुकीच्या धाक दाखवून बाबा राम रहिमने त्याच्या गुपित गुहेत संबंधित पिडीत साध्वीवर बलात्कार केल्याच बोलल जात. बाबाच्या सेवेत असणारी हि साध्वी एकदा बाबा आराम करत असलेल्या गुहेत गेली होती. त्यावेळी बाबा राम रहीम हा टीव्हीवर अश्लील फिल्म बघत होता. बाबाने पिडीत साध्वीला बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर बाबाने अनेक वेळा साध्वीवर अत्याचार केला. शेवटी एप्रिल २००२ मध्ये पिडीतेने हिम्मत दाखवत थेट पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना एक चिठ्ठी लिहिली त्यात बाबाचे काळे कारनामे लिहिण्यात आले होते.

baba rahim 1

डेरा सच्चा सौदा आणि बाबा राम रहीमचे वाद
2001 – साध्वीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप
2002 – पत्रकार रामचंद्रच्या हत्येचा आरोप
2003 – डेरा सच्चा सौदाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य रणजीत सिंह यांचं हत्याकांड
2007 – गुरु गोविंद सिंह यांच्या वस्त्रांवरुन शिखांसोबत वाद
2010 – डेराचे माजी व्यवस्थापक फकीर चंद बेपत्ता होण्याचं प्रकरण
2012 – डेरा सच्चा सौदाच्या 400 साधूंना नपुंसक केल्याचा आरोप
२०१७ – बलात्कार प्रकरणात बाबा दोषी