ड्रामा क्वीन साकारणार हनिप्रीतची भूमिका

गुरमीत राम रहीम सिंग अर्थात स्वतःला ‘मेसेंजर ऑफ गॉड’ म्हणवणारा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंगवर दोन अनुयायी साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी गुरमीतला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

फोटो -इंडिया टीव्ही

लवकरच गुरमीत सिंगच्या आयुष्यावर चित्रपट बनविण्यात येणार असून या चित्रपटाच्या पात्राची निवड देखील करण्यात आली आहे.
राजा मुराद हे राम रहीमची भूमिका साकारणार  आहेत तर  डेरा सच्चाची माणसकन्या म्हणून घेणाऱ्या हनिप्रीतच्या भूमिकेसाठी ड्रामा क्वीन, आयटम गर्ल राखी सावंतची निवड करण्यात आली आहे.  मंगळवार पासूनया चित्रपटाची शुटींग सुरु होणार आहे.

राखी सावंत नेहमीच काहीना काही कारणास्तव चर्चेत असते. अनेक दिवसांनी राखी तिच्या चित्रपटासाठी चर्चेत आली आहे. राखीचे करियर संपण्याच्या मार्गावर असताना राखीला हा चित्रपट मिळाल्यामुळे ती  पुन्हा चर्चेत आली आहे.