राम रहीम वर ट्विट करून गीता-योगेश्वर ने जिंकली मनं

वेबटीम : बलात्कारी बाबा गुरमीत राम रहीम याला शिक्षा सुनावल्या नंतर सर्वच स्थरातून प्रतिक्रिया येत आहेत. कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि गीता फोगट या दोघांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत . या ट्वीटमधून दोघांनीही न्याय व्यवस्थेच भरभरून कौतुक केल आहे .

राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर सिनेजगत,राजकारण आदी सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत . बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर राम रहीमला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करताना कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि गीता फोगाट या दोघांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गीता फोगट
पापाचा घडा एक न एक दिवस भरतोच आणि जेव्हा भरतो तेव्हा पाप्याला पापाची शिक्षा भोगावीच लागते . न्यायव्यवस्थेला प्रणाम

बाबाला मिळालेल्या शिक्षेच स्वागत करताना योगेश्वर दत्त म्हणतो
पापाचा अंत एक दिवस नक्कीच होतो. भारत हा ऋषी-मुनींचा पवित्र देश आहे. जो कोणी आपल्या घृणास्पद कृत्याने अपवित्र करेल त्याला अशीच शिक्षा होणार