‘माथाडी कायद्याला विरोध करणारे संभाजी पाटील निलंगेकर निवडणुकीत पराभुत व्हायला पाहिजे होते’

टीम महाराष्ट्र देशा : गेली चार वर्ष कामगार म्हणून आम्ही मोठा कठीण काळ अनुभवला आहे. गेल्या ५०-६० वर्षात जे कमावले ते गेल्या चार वर्षात मातीत घालण्याचे काम मागील सरकारने केले. माथाडी कायदा गुंडाळला, कामगारांची ३३ मंडळे गुंडाळली त्यातील १० हजार कोटींपेक्षा जास्त फंड कुठे गेला हे त्यांनी सांगावे. कामगारांची स्वायत्तता काढून घेण्याचे काम केले गेले आहे. माथाडी मंडळाला स्टेशनरी घ्यायची म्हटले तरी मुंबईतून परवानगी घ्यावी लागते. वन मॅन काम ही कामाची पद्धत रुजवली गेली. तर पुणे -माथाडी कायद्याला विरोध करणारे संभाजी पाटील निलंगेकर निवडणुकीत पराभुत व्हायला पाहिजे होते. पण बर झाल त्यांची सत्ता गेली, अशी टीका महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडाचे अध्यक्ष डाॅ बाबा आढाव यांनी निलंगेकर यांच्यावर केली.

पुण्यातील मार्केट यार्डातील हमाल भवनात माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, कामगार मंत्री दिलीप-वळसे पाटील, अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पौळ, कामगार उपायुक्त विकास पनवेलकर, सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत, बाजार समितीचे प्रशासक बी जे. देशमुख, पौर्णिमा चिक्करमाने, सरचिटणीस सुभाष लोमटे, हनुमंत बहिरट सचिव संतोष नांगरे, उपाध्यक्ष डॉ. हरीश धुरट, राजकुमार घायाळ, विकास मगदुम, नवनाथ बिनवडे, शिवाजी शिंदे, चंदणकुमार उपस्थित होते. यावेळी वळसे-पाटील यांच्या हस्ते सुमन गायकवाड आणि गहीनीनाथ सजगणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Loading...

यावेळी वळसे-पाटील म्हणाले, मी अजून नवीन आहे त्यामुळे मला सांभाळून घ्या. माथाडी कायद्याची अमंलबजावणी करणे ही मागणी चुकीची नाही. याबाबत मी एक बैठक आयोजित करतो. सर्व अधिकारी, कामगारांचे प्रमुख प्रतिनिधी एकत्रित बसून व्यवहारीक दृष्ट्या योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. मुख्यमंत्री, मंत्री कोणीही असले तरी या देशातील कष्ट करणारे, असंघटित कामगार आहेत त्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळतो का नाही, त्यांची अडवणूक होते का, त्यांचे शोषण होते का हे पाहणे सरकारचे काम आहे. आजकाल कंत्राटी कामगारांना मोठ्या प्रमाणात वापरून स्थानिक त्या ठिकाणी डावले जाते. बाहेरून कामगार आणून त्यांच्या करून काम करून घ्यायचे. कोणताही कायदा पालन करायचे नाही ही परिस्थिती दिसते. माथाडी कायदा देशात लागू होण्यासाठी सरकारच्या वतीने पत्रव्यवहार केला जाईल. तसेच राज्यातील खासदारांच्या वतीने केंद्रावर दबाव आणून हा कायदा देश पातळीवर नेण्याचा प्रयत्न करू. माथाडी कायद्याला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा कार्यक्रम करू व त्या कार्यक्रमाला सर्व संबधित लोकांना बोलवू असे आश्वासन ही यावेळी वळसे-पाटील यांनी दिले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
माझी बदनामी करणारे 80 टक्के मराठा तरुण, आज मराठा समाजात जन्मल्याची लाज वाटते : तृप्ती देसाई
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
संज्याला मी चर्च गेट स्टेशनवर फाटक्या कपड्यात पेटी वाजवताना बघितलं होतं ; आज खात्री झाली : निलेश राणे
कोरोना इफेक्ट् : भारतात कंडोमच्या विक्रीत तब्बल ५० टक्क्यांनी वाढ
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं