‘बाप शेर तो बेटा सवाशेर’ मोहम्मद नबिच्या मुलाची १६व्या वर्षीच तुफान खेळी

काबुल: जागतीक क्रिकेटमध्ये जरी अफगाणीस्तान संघाची दखल घेतली जात नसली तरी संघातील काही खेळाडूची दखल मात्र क्रिकेट विश्वाला घ्यायला भाग पाडले आहे. यात दोन खेळाडूंचे नाव आघाडीवर येतात पहिले नाव राशिद खान आणि दुसरे नाव मोहम्मद नबीचे.

या दोन्ही खेळाडुंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ची चांगलीच ओळख निर्माण केली आहे. यात आता आणखी एक नाव जोडले जाण्याची शक्यता आहे. ते म्हणजे १६ वर्षीय हसन खानचे. हसन खान हा ३६ वर्षीय मोहम्मद नबीचा मुलगा आहे. हसन खान सध्या शारजा क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेतोय. नुकत्याच एका सामन्यात हसनने बुखातिर इलेव्हन संघासाठी खेळताना तुफान अर्शशतकी खेळी केली. या सामन्यात त्याने केवळ ३० चेंडुत ७१ धावांची तुफान खेळी साकारली. या खेळीत त्याने १ चौकार आणि ७ उत्तुंग षटकार लगावले.

जागतीक क्रिकेटमध्ये आफगाणिस्तानला ओळख निर्माण करुन देण्यात मोहम्मद नबीचा मोलाचा वाटा आहे. गेल्या काही वर्षापासुन तो आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत आहे. आता आगामी आयपीएल स्पर्धेत त्याच्या मुलाला जर एखाद्या आयपीएल संघाने ताफ्यात सामिल करुन घेतले तर नवल नको वाटायला.

महत्त्वाच्या बातम्या

IMP