पाहा, टायगर श्रॉफच्या ‘बागी 3’चा धमाकेदार ट्रेलर

टीम महाराष्ट्र देशा : ‘बागी’ मालिकेतील ‘बागी ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय या सिनेमात रितेश देशमुख टायगरचा भाऊ विक्रम आणि पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘बागी’ फ्रंचाईजीमधील हा तिसरा सिनेमा आहे. काही क्षणांपूर्वी ‘बागी 3’चा ट्रेलर रिलीज झाला आणि टायगरचे चाहते पुन्हा एकदा ‘अॅक्शन मोड’मध्ये आलेत. ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफ पुन्हा एका जबरदस्त अॅक्शन अवतारात दिसतो. साहजिकच टिष्ट्वटरवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडतोय.

तसेच ‘बागी’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि टायगर मुख्य भूमिकेत होते. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन सब्बीर खानने केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

दरम्यान, ‘बागी 3’चं दिग्दर्शन अहमद खाननं केलं आहे. तर निर्मिती साजिद नाडियालवालाची आहे. या सिनेमात आशुतोष राणा, चंकी पांडे आणि अंकिता लोखंडे यांच्याही भूमिका असल्याचं बोललं जात आहे. पहिल्या दोन भागांप्रमाणे या तिसऱ्या भागातही जबरदस्त अॅक्शन सीन्स असणार आहेत.