Baadshaho: ‘मेरे रश्के कमर’ हे गाणे रिलीज

‘ बादशाहो’ या चित्रपटात हे गाणे राहत फतेह अली खान यांनी गायले  आहे. गाणे मूळ ट्रॅक नुसरत फतेह अली खान यांनी गायले होते, बादशाहो या चित्रपटात हे गाणे पुन्हा चित्रित करण्यात आले आहे.

अजय देवगण व इलियाना डिक्रूज यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. सुरुवातीला पारंपारिक शैली मध्ये  एका राणीच्या रूपात इलियाना डिक्रूजला दाखवले गेले आहे.

अजय आणि इलियाना डिक्रूज सोबत विद्युत जामवाल, इमरान हाशमी, ईशा गुप्ता या चित्रपटात आहेत. मिलन लुथरिया  हे ‘ बादशाहो’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
चित्रपट १ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.