‘बा विठ्ठला, मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊ देत’; मनसेच अनोखं साकडं

raj thackeray

मुंबई : आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल १९ जुलै रोजी स्वतः गाडी चालवत पंढरपुरात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र मंत्री आदित्य ठाकरे हे देखील आले असून आज त्यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या सावटामुळे यंदा देखील मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत पंढरपूरला दाखल झाले असल्याने विरोधकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

‘हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊ दे. आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेउ दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पांडुरंग… पांडुरंग…,’ असं साकडंच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घातलं आहे.

दरम्यान, पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP