कन्नड भाषेशी कोणतीही तडजोड नाही, बी. एस येडूरप्पांचा अमित शहांना ‘खो’

b s yedurappa says Kannada is the principal language. We will never compromise its importance

टीम महाराष्ट्र देशा: ‘एक देश एक भाषे’चा नारा गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून देण्यात आला आहे. 2020 मध्ये सार्वजनिक स्तरावर हिंदी दिवस साजरा केला जाईल. हिंदीला जगभरात सर्वाधिक व्यापक भाषा करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं जाईल. असं अमित शहा यांनी हिंदी भाषा दिनी सांगितले होते.

शहा यांच्या विधानानंतर दाक्षिणात्य नेते आक्रमक झाले आहेत. अभिनेते कमल हसन यांनी देशात एक भाषा लादली जाऊ शकत नाही, असे झाल्यास मोठे आंदोलन होईल. असा इशारा दिला आहे. तर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी. एस येडूरप्पा यांनी आपण कन्नड भाषेशी कोणतीही तडजोड करणार नाही, असं म्हंटले आहे.

देशामध्ये सर्व भाषा एकसमान आहेत. कर्नाटकात कन्नड ही प्रमुख भाषा आहे. आम्ही कधीच कन्नड भाषेसोबत तडझोड करणार नाही. कन्नड भाषा आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असं येडूरप्पा यांनी ट्विटद्वारे म्हंटले आहे. त्यामुळे शहा यांच्या एक देश एक भाषे’च्या घोषणेला भाजपमधून विरोध होताना दिसत आहे.

केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शहा यांनी हिंदी दिना निमित्त बोलताना ‘एक देश एक भाषा’ करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. प्रत्येकाने जास्तीत जास्त हिंदीचा वापर केला पाहिजे. हिंदी ही आपली राष्ट्र भाषा आहे. विशेषतः ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रत्येक मुलाला हिंदी शिकवली पाहिजे. सध्या त्याचे प्रमाण कमी आहे. तसेच भारतात विविध भाषेचा देश आणि प्रत्येक भाषेची एक विशिष्ट ओळख आहे. मात्र आपल्या देशात एक भाषा असणे आवश्यक आहे ज्याने जगात भारताला ओळखले जाईल., असे विधान अमित शहा यांनी केले होते.

दरम्यान, दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांनी देखील अमित शहा यांच्या विधानाच समाचार घेतला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या देशाच्या एकतेसाठी त्याग केला आहे. मात्र, लोक आपली भाषा, संस्कृती आणि ओळख विसरू शकत नाहीत. भारत एक असा देश आहे, त्याठिकाणी लोक एकत्र बसून जेवण करतात. कोणावर काही लादू शकत नाही. नवीन कायदा लागू करण्याआधी सामान्य लोकांशी चर्चा केली पाहिजे. असं विधान केले आहे.