Karnataka Verdict: जनतेन नाकारूनही काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करत आहे- येडियुरप्पा

टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. मात्र, सत्तास्थापनेसाठी लागणाऱ्या आकड्यांच्या खेळात भाजप पिछाडीवर पडली आहे. ३८ जागांवर असणाऱ्या जेडीएसला पाठींबा देत कॉंग्रेसने भाजपला चांगलेच खिंडीत पकडले आहे. दरम्यान, कर्नाटकातील जनेतेने काँग्रेसला नाकारलं आहे. जनता काँग्रेस मुक्त कर्नाटकला साथ देत आहे. जनतेन नाकारूनही काँग्रेस सत्तास्थापनेचा दावा करत असल्याची टीका बी एस येडियुरप्पा यांनी केली आहे.

Loading...

कर्नाटकच्या जनतेने भाजपला सर्वाधिक जागांवर विजयी करत राज्यातील सर्वात मोठी पार्टी म्हणून कौल दिला आहे. भाजप १०४ जागा मिळवत आघाडीवर आहे, तर कॉंग्रेसला ७८ जागा मिळताना दिसत आहे. अस असल तरीही कॉंग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएसच्या कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेसने बिनशर्त पाठींबा दिला असून जेडीएसने सरकारचे प्रतिनिधत्व करण्याची ऑफर दिली आहे.

एका बाजूला कॉंग्रेसने सत्तेच्या सारीपाटावर खेळ खेळला आहे, तर दुसरीकडे विजय आपलाच आहे, म्हणत गाफील राहिलेल्या भाजपच्या गटात आता धावपळ होताना दिसत आहे. कर्नाटकातील निरीक्षक असणारे प्रकाश जावडेकर आणि जे पी नड्डा हे दिल्लीवरून बेंगलोरला पोहचत असून पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे.Loading…


Loading…

Loading...