Breaking: आकड्यांच्या खेळात भाजप तोंडघशी; येडीयुरप्पांचा राजीनामा

टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यात भाजपचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना अपयश आले आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आज कर्नाटक विधानसभा सभागृहात भाजपला विश्वासदर्शक ठराव मांडायचा होता. मात्र, दिवसभराच्या पळापळीनंतर देखील भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश येत असल्याच दिसल्याने येडीयुरप्पा यांनी आपण राजीनामा देत असल्याच घोषित केले. राजीनामा देत असतान येडीयुरप्पा यांनी भावनिक भाषण करत कर्नाटकच्या जनतेला साद घालण्याचा प्रयत्न केला

बहुमतासाठीचा आकडा गाठण्यात अपयश येत असल्याने पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि येडीयुरप्पा यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे.

bagdure

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानुसार बहुमत सिद्ध करता न आल्याने भाजपने नामुष्की ओढवून घेतली आहे.

विश्वासदर्शक ठराववापूर्वी भाजपकडून मोठ्या प्रमाणत घोडेबाजार करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे. तर शपथविधीवेळी कॉंग्रेसचे दोन आमदार बेपत्ता झाले होते, अखेर पोलसांनी एका हॉटेलवर छापा टाकून प्रताप गौडा आणि आनंद सिंह या आमदाराना सोडवले होते.

यावेळी भावनिक होत येडीयुरप्पा यांनी भाषण केलंं, ते म्हणाले की, निवडणुकीत कर्नाटकच्या जनतेने आम्हाला कौल दिला, आजवर आपल्याला मिळालेली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडली. सिद्धरामय्या सरकारला आलेल्या अपयशामुळे जमतेने आम्हाला बहुमत दिल, सिद्धराम्या सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले. आम्ही 40 च्या संख्याबळावरून 104 च्यावर जागा जिंकल्या. जनतेकडून मिळालेले प्रेम पाठिंबा कधीही विसरू शकत नाही.  यावेळी काँग्रेस आणि जेडीएस चुकीचे राजकारण करत असल्याचा आरोप येडीयुरप्पा यांनी केला. तसेच अखेरच्या स्वासापर्यंत आपण जनतेची सेवा करत राहणार असल्याच त्यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...