कर्नाटकात भाजपने केला सत्ता स्थापनेचा दावा; कॉंग्रेसच्या पाठींब्यावर जेडीएसही भेटणार राज्यपालांना

bs yediyirappa

टीम महाराष्ट्र देशा:  कर्नाटकमध्ये १०४ जागा जिंकून सर्वात मोठी पार्टी ठरलेल्या भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे, भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार बी एस येडीयुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत आपल्याकडे सर्वाधिक जागा असून सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा दावा केला आहे.

२२४ जागा असणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या २२२ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपला १०४ कॉंग्रेस ७८ तर जेडीएसला ३८ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, भाजपला सर्वाधिक जागा असल्या तरी सत्तास्थापनेसाठी लागणाऱ्या आकड्यांच्या खेळात ते पिछाडीवर आहेत. तर भाजपला खिंडीत पकडण्यासाठी कॉंग्रेसने जेडीएसला पाठींबा देत कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे.

बी एस येडीयुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेतली असली तरी, जेडीएसचे कुमारस्वामी हे देखील राज्यपालांची भेट घेवून कॉंग्रेसच्या पाठींब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान, आता सर्वाधिक जागा असणाऱ्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करायचे, कि कॉंग्रेसचा पाठींबा घेणाऱ्या जेडीएसला याचा निर्णय राज्यपालांच्या हातामध्ये आहे.Loading…
Loading...