मोदींच्या इतक्या हत्या कोणत्याच पंतप्रधानांनी केल्या नाहीत;बी. जी. कोळसे पाटलांची मुक्ताफळे

कोळसे पाटलांच्या या विधानानं वाद उभा राहण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा – “पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन-तीन हजार मुस्लिमांची कत्तल करुन आले आहेत. मोदींच्या इतक्या हत्या कोणत्याच पंतप्रधानांनी केल्या नाहीत. असं वादग्रस्त विधान माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केलं आहे . एक खुनी सभागृहात आहे पंतप्रधान म्हणून, तर एक खुनी पक्षाचा अध्यक्ष आहे.”असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. कोळसे पाटलांच्या या विधानानं आता वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

अहमदनगरमध्ये विराट सामाजिक ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. ऐक्य परिषदेला सत्यपाल महाराज, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नौमानी, जमाते इस्लामी हिंदचे तौफिक अस्लाम खान, अखिल भारतीय बसव परिषदेचे प्रदेशाध्यक्ष शिवानंद हैबतपूरे, स्मिता गोविंद पानसरे, अखिल भारतीय माळी महासंघाचे शंकरराव लिंगे, मराठा सेवा संघ, बामसेफसह अनेक मान्यवर यांची उपस्थिती होते.“मोदींची लोकप्रियता कृत्रिम आहे. खरी लोकप्रियता नेहरुंची होती, इंदिरा गांधींची होती, गांधीजींची होती. मोदींची लोकप्रियता मॅनेज केलेली आहे.”, असा निशाणाही कोळसे पाटलांनी साधला.