लष्कराचा अपमान केल्याप्रकरणी आझम खान यांच्यावर देशद्रोहाचा खटला

बिजनौरच्या चांदपुर पोलिस स्टेशनमध्ये देशद्रोहाचा खटला दाखल

वेबटीम: भारतीय लष्करातील जवानावर बलात्काराचे आरोप केल्याचं प्रकरण आझम खान यांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे कारण  समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते आझम खान यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

खान यांच्यावर भारतीय दंड विधानाचे कलम 153A आणि 505 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून उत्तर प्रदेशचे माजी मंत्री शिव बहादूर सक्सेना यांचे पुत्र आणि भाजप नेते आकाश सक्सेना यांनी हे एफआयआर दाखल केले.यासोबतच खान यांच्यावर देशद्रोहाचा खटला सुद्धा दाखल करण्यात आला आहे.

बिजनौरमध्ये देशद्रोहाचा खटला

आजम खान यांच्या विरुद्ध बिजनौरच्या चांदपुर पोलिस स्टेशनमध्ये देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे.विश्व हिंदू परिषदेचे अनिल पांडे आणि कपिल चौधरी यांनी हा खटला दाखल केला.पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या 124,131 आणि 505 कलमा लावल्या आहेत.

काय म्हणाले होते आझम खान?

27 जून रोजी त्यांनी झारखंड आणि काश्मिरात तैनात सैनिक आणि निमलष्करी दलाच्या जवानांवर वादग्रस्त विधान केले होते.झारखंड आणि कश्मीरात महिला दहशतवादी कथितरीत्या सैनिकांचे गुप्तांग कापून जातात.एवढेच नव्हे,तर त्यांनी सैनिकांना बलात्कारी असेही म्हटले होते.एवढेच नव्हे,तर आपल्या विधानावर टीका होत असतानाही त्यांनी माघार घेण्यास नकार दिला होता.

You might also like
Comments
Loading...