देशावर त्यावेळी लादलेली आणीबाणी ही सध्याच्या परिस्थितीपेक्षा चांगली होती : आझम खान

टीम महाराष्ट्र देशा : २५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देशावर आणीबाणी लादण्यात आली होती. आज या घटनेला ४४ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकांनी आणीबाणीचा धिक्कार करत ट्विट केले आहे. तर समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी आणीबाणीचे निमित्त साधत भाजप सरकारलाच फटकारले आहे. देशावर त्यावेळी लादलेली आणीबाणी त्रासदायकच होती. परंतु, सध्याच्या स्थितीपेक्षा चांगली होती, अस आजम खान म्हणाले आहेत.

आजम खान म्हणाले की, ममता बॅनर्जी जे सांगत आहेत, त्यापेक्षाही देशाची स्थिती बिकट आहे. ममता केवळ आपल्या राज्याविषयी बोलत आहेत. मात्र आम्ही तुम्हाला अनेक राज्यातील त्रासाबद्दल सांगत आहोत.भाजपने मोठ्या प्रमाणात हिंसक कामे केली आहेत. त्यामुळे अशांती निर्माण झाली. परंतु, त्यासाठी कोणत्याही एका पक्षाला जबाबदार धरून चालणार नाही. तसेच भारत स्वातंत्र झाल्यापासूनच्या ७० वर्षांचा कालावधी मुस्लिमांसाठी फारच हिंसक होता, असा दावा आझम खान यांनी केला आहे.

Loading...

दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील आणीबाणीच्या घटनेवर ट्विट केलं आहे. आजच्या दिवशी देशात आणीबाणी घोषित केली होती मात्र मागील ५ वर्षात देशात सूपर इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. आपल्याला इतिहासाकडून खूप काही शिकणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या संस्थांनांचे रक्षण करण्यासाठी लढण्याची इच्छा हवी असं ममतांनी ट्विटमध्ये सांगितले आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी