आझाद मैदान दंगलीतील आरोपीनेच पेटवली वांद्रे झोपडपट्टी

bandra fire

टीम महाराष्ट्र देशा: गुरुवारी वांद्रे स्टेशन जवळ असणाऱ्या बेहरामपाडा झोपडपट्टीला मोठी आग लागली होती. प्रथमदर्शनी ही आग अतिक्रमण कारवाईवेळी लागल्याच दिसून आल, मात्र यामधील वेगळच सत्य समोर आल असून झोपडपट्टीत आग लावणारा मास्टरमाईंड सापडला आहे. निर्मलनगर पोलिसांनी शब्बीर खान या 29 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. विशेषम्हणजे खान हा 2012 मध्ये आझाद मैदानावरील दंगलीतील आरोपी आहे. शब्बीर हा अवैध झोपड्या बनवून विकण्याचं काम करत असल्याची माहिती मिळत आहे.

Loading...

मुंबई महापालिकेच्या वतीने गुरुवारी बेहरामपाडा भागात अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरु केली जात होती. याच दरम्यान अचानक काही झोपड्यांना आग लागली. ही कारवाई केली जात असताना शब्बीर आणि त्याच्या साथीदारांनी झोपड्यांच्या छतावर रॉकेल ओतून एक झोपडीतील सिलेंडरही उडवून दिले.

 

 







Loading…










Loading…

Loading...