आयुष शर्माने मोठ्या थाटात केले बाप्पाचे विसर्जन

aayush shrma

मुंबई : राज्यभरात मोठ्या उत्साहाने गणपती शनिवारी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. अभिनेत्री शिल्पाने देखील बाप्पाला मोठ्या आनंदात बाप्पाला निरोप दिला. त्यानंतर अभिनेता आयुष शर्मानेही त्याच्या बाप्पाला निरोप दिला. त्याचे काही फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध छायाचित्रकार योगेश शहा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर आयुष आणि त्याच्या बाप्पाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता सोहेल खान आणि आयुष गणपतीचं विसर्जन करताना दिसत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाचे औचित्य साधत बॉलिवूडचा अभिनेता सलमानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ मधील ‘विघ्नहर्ता’ हे गाणं प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं. यावर्षी पहिल्यांदाच सलमान बाप्पाच्या स्वागतासाठी उपस्थितीत राहू शकलेला नाही.

महत्वाच्या बातम्या :