Ayurvedic Tips | आंघोळीनंतर त्वचेला खाज सुटू लागल्यावर करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Ayurvedic Tips | टीम कृषीनामा: बहुतांश लोकांना आंघोळ केल्यानंतर त्वचेवर खाज येते. आंघोळीनंतर शरीराची स्वच्छता नीट न होणे, जास्त साबण वापरणे, बॉडी वॉश किंवा रसायनयुक्त साबण वापरणे किंवा जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यावर शरीराला खाज सुटायला लागते. या समस्येमुळे त्वचेवरील कोरडेपणा वाढत जातो. त्यामुळे या समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, ही उत्पादन त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे आंघोळनंतर येणारी खाज दूर करण्यासाठी तुम्ही पुढील आयुर्वेदिक पद्धती फॉलो करू शकतात.

कडुलिंब आणि तुळस (Neem and basil-Ayurvedic Tips to Relieve Itching)

आंघोळीनंतर खाज येत असेल तर तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात कडुलिंब आणि तुळशीची पाने मिसळू शकतात. कारण तुळशीमध्ये अँटी मायक्रोबियल आणि अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे खाज, पुरळ इत्यादी समस्या सहज दूर करतात. त्यामुळे आंघोळीनंतर खाज येण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात कडुलिंब आणि तुळशीची पाने मिसळू शकतात.

मध (Honey-Ayurvedic Tips to Relieve Itching)

आंघोळीनंतर खाज येण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी मध उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला खाज आणि पुरळ असलेल्या भागावर वीस मिनिटे मध लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची त्वचा कोमट पाण्याने धुवावी लागेल. त्याचबरोबर ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करू शकतात. मधामध्ये आढळणारे आयुर्वेदिक गुणधर्म खाज येण्याची समस्या सहज दूर करू शकतात.

ग्रीन टी (Green tea-Ayurvedic Tips to Relieve Itching)

ग्रीन टीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेवरील खाज येण्याची समस्या दूर करू शकतात. यासाठी तुम्ही दिवसातून एक ते दोन कप ग्रीन टीचे सेवन करू शकतात. ग्रीन टीमध्ये आढळणारे अॅंटीबॅक्टरियल, विटामिन ए आणि विटामिन ई यासारखे गुणधर्म आंघोळीनंतर येणाऱ्या खाजेची समस्या दूर करू शकतात.

आंघोळीनंतर त्वचेवर येणारी खाज दूर करण्यासाठी तुम्ही वरील आयुर्वेदिक टिप्स फॉलो करू शकतात. त्याचबरोबर त्वचेला चमकदार बनवण्यासाठी तुम्ही लिंबाचा पुढील पद्धतीने वापर करू शकतात.

लिंबू आणि हळद (Lemon and Turmeric-For Glowing Skin)

चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी लिंबू आणि हळद फायदेशीर ठरू शकते. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर लिंबू आणि हळदीचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने वृद्धत्वाची लक्षणे आणि सुरकुत्या देखील कमी होऊ शकतात. लिंबू आणि हळद वापरण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. चेहऱ्यावर क्लीनर न वापरता लिंबू आणि हळद लावल्याने समस्या निर्माण होऊ शकतात.

लिंबू आणि साखर (Lemon and sugar-For Glowing Skin)

लिंबू आणि साखरेचे स्क्रब त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. लिंबू आणि साखरेचे स्क्रब वापरल्याने त्वचेवरील मुरुमांची समस्या दूर होऊ शकते. लिंबू आणि साखरेचे मिश्रण वापरल्यानंतर कोरफडीचा वापर करणे टाळावा. लिंबू आणि साखरेच्या वापरानंतर कोरफड वापरल्यास त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जाऊ शकते.

लिंबू आणि तांदळाचे पीठ (Lemon and rice flour-For Glowing Skin)

तांदळाचे पीठ आणि लिंबाचा फेस पॅक त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतो. लिंबू आणि तांदळाच्या पिठामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात, जे त्वचेला खोलवर साफ करण्यास मदत करतात. त्याचबरोबर या फेस पॅकच्या मदतीने चेहऱ्यावरील चमक वाढू शकते आणि त्वचेचा रंग देखील सुधारू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Iron-Rich Fruits | निरोगी राहण्यासाठी आहारात करा ‘या’ आयरनयुक्त फळांचा समावेश

Periods Mood | मासिक पाळी दरम्यान मुड स्विंग टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Glowing Skin | त्वचेला चमकदार बनवण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Periods Cramps | मासिक पाळीतील असाह्य वेदनांपासून त्रस्त आहात? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Digestive System | पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पेयांचा समावेश

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.