ही लढाई कायदेशीर हक्कासाठी, पाच एकर जमिनीची भीक नको : ओवेसी

blank

टीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अयोध्येबाबतच्या महत्वपूर्ण निर्णयाचे देशाने स्वागत केले आहे. मात्र या निर्णयावर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असला तरी अचूक नाही, असे ओवेसी म्हणाले आहेत.

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज लागला. सर्वोच्च न्यायालयात सकाळी याप्रकरणी सुनावणी झाली. तसेच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने हा निकाल दिला. या ऐतिहासिक निर्णयानंतर अनेक नेत्यांनी निर्णयाच्या स्वागतात प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर असदुद्दीन ओवेसी  यांनी पत्रकार परिषदेत निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले की, ‘जर बाबरी मशीद पाडली गेली नसती, तर सर्वोच्च न्यायालयानं काय निर्णय दिला असता? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असला तरी अचूक नाही. ही लढाई कायदेशीर हक्कासाठी होती. पाच एकर जमिनीची भीक नको. मी हैदराबादमध्ये फिरलो तर माझ्या झोळीत जेवढे पैसे जमा होतील तेवढ्यात मी 5 एक्कर जमीन घेईल. या राष्ट्राची वाटचाल आता हिंदू राष्ट्राकडे होत आहे. परंतु आम्ही भारताचे सार्वभौमत्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करू, असे ओवेसी म्हणाले.

#आयोध्या निकाल सर्वोच्च न्यायालयाने मांडलेले मुद्दे

– बाबरी मस्जिद रिकाम्या जागी बांधली गेली नव्हती.

– निर्मोही आखाडा सेवक नाही,

– उत्खननात मंदिर संरचनेशी संबधित जुने अवशेष

– इस्लामिक कलाकृतीचे पुरावे आढळले नाही.

– मस्जिदच्या बांधकामात जुन्या दगडांचा वापर करण्यात आला होता.

– शेकडो वर्ष जुनी कलाकृती, मंदिराशी साधर्म्य साधणाऱ्या कलाकृती उत्खानात मिळाल्या आहेत.

– रामाचा जन्म अयोध्येत झाला यावर वाद नाही.

– वादग्रस्त जागेत हिंदूंची श्रद्धास्थाने, सीतेची स्वयंपाक घर, चौथरा, संरचनांचे अस्तित्व मान्य,

– हिंदूंच्या दाव्याला पुष्टी, रामलाल्लाचा ऐतिहासिक ग्रंथांमध्ये उल्लेख

– तट्रस्ट स्थापन करून राम मंदिर स्थापन करण्याचे आदेश

– अलाहाबाद न्यायालयाने दिलेल्या निर्णयात वादग्रस्त जमिनीचे तीन भाग चुकीचे

– ६७ पैकी ५ एकर जागा मुस्लीम पक्षकाराला

– सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी जागा देण आवश्यक आहे.

– भूमिकेमुळे हिंदू मुस्लीम वाद निर्माण झाला

– सीजेआयच्या अहवालानुसार स्वातंत्रपूर्व काळापासून हिंदू तिथे पूजा करत होते.

महत्वाच्या बातम्या