fbpx

आयोध्या दहशतवादी हल्ल्यातील चार जणांना जन्मठेप तर एकाची सुटका

टीम महाराष्ट्र देशा : आयोध्या दहशतवादी हल्ल्याबाबत प्रयागराज येथील विशेष न्यायालयाने निकाल सुनावला आहे. या दहशतवादी हल्ल्या प्रकरणी न्यायालयाने पाचपैकी चार आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर एका आरोपीची सुटका केली आहे.

राम जन्मभूमी येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा सुनावली जावी अशी मागणी करण्यात येत होती. 5 जुलै 2005 रोजी सकाळी 9.15 च्या सुमारास दहशतवाद्यांनी रामजन्मभूमी परिसरात बॉम्बस्फोट घडवला होता. जवळपास अडीच तास चाललेल्या चकमकीत पोलिसांनी 5 दहशतवाद्यांना ठार केले होते. या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना सुरक्षा यंत्रणांनी जम्मू काश्मीर येथून अटक केली होती.