#अयोध्या : सुन्नी वक्फ बोर्ड पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही

टीम महाराष्ट्र देशा : सगळ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा ही रामलल्लाची असल्याचे सांगत या जागेवर मंदिर उभारण्यासाठी येत्या 3 महिन्यात ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याच बरोबर मुस्लिमांना अयोध्येतच 5 एकर जागा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाने या निर्णयबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र बोर्ड न्यायालायाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

न्यायालयाने मशीद रिकाम्या जागी बांधली नव्हती. मशिदीखाली मोठी रचना होती असं कोर्टाने मांडलेल्या मुद्य्यांमध्ये मान्य केले आहे. त्यानंतर शिया वक्फ बोर्डाचा दावा एकमताने फेटाळला. गोगोई म्हणाले, ‘आम्ही १९४६ च्या फैजाबाद कोर्टाच्या निकालाला आव्हान देणारी शिया वक्फ बोर्डाची सिंगल लीव पिटीशन फेटाळत आहोत’ असं कोर्टाने म्हटलं आहे.

वादग्रस्त जागा हिंदुंना, मुस्लिमांना पर्यायी जागा देण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे. वादग्रस्त जागेत १८५६-५७ पर्यंत याठिकाणी नमाज पढण्यात आला नव्हता. त्यापूर्वी याठिकाणी हिंदूकडून पूजा केली जात होती. या जागेवर दावा सांगणारा कोणताही पुरावा सुन्नी वक्फ बोर्डाला सादर करता आला नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.मंदिर तोडून मशीद बनवण्यात आली याचा कोणताही पुरावा नाही असं कोर्टाने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...

 

Loading...