fbpx

आयोध्या प्रकरण : वाद आपापसातील चर्चेने सोडविण्यास हिंदू महासभेच्या वकिलांचा विरोध

टीम महाराष्ट्र देशा : आयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद या वादग्रस्त प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाकडून आज निकाल येण्याची शक्यता होती. पण राम मंदिर आणि बाबरी मशीद हा प्रश्न जमिनीच्या वादाचा नसून धार्मिक भावनांचा असल्याने हा प्रश्न सोडवण्यासाठी फक्त एक मध्यस्थ नेमण्याऐवजी मध्यस्थांचे पॅनल नेमण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्टीकरण देत हा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे.

आज न्यायालायाकडून आम्ही दिलेला निर्णय हा मान्य असेल का असा प्रश्नही दोन्ही पक्षकारांना यावेळी विचारला.पण मध्यस्थीसाठी हिंदू महासभेच्या वकिलांनी विरोध केला.यानंतर सर्वोच न्यायालयाकडून मध्यस्थीसाठी प्रत्येक पक्षकाराने नावे द्यावीत आणि चर्चेसाठी प्रत्येक पक्षकाराने समोर यावे सांगितले.त्यामुळे आज मध्यस्थाच्या नियुक्तीवर मात्र आज निर्णय होण्याची शक्यता आहे.

नुकतेच निवृत्त झालेले सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पूर्वीच्या पीठाचे भाग असलेले न्या. भूषण व न्या. नझीर हे नव्या खंडपीठात परत आले आहेत. मशीद हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे निरीक्षण 1994 साली दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते. त्याचा पुनर्विचार करण्यासाठी हा मुद्दा पाच सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपवण्यास त्या पीठाने 27 सप्टेंबर 2018 च्या निर्णयान्वये नकार दिला होता.