टीम महाराष्ट्र देशा- अयोध्येमध्ये राम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी बौद्ध मंदिर होते, नंतर मुस्लिम आणि हिंदूंनी तेथील बौद्ध मंदिर पाडून तेथे राम मंदिर आणि बाबरी मशीद बांधली असं खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. जयपूर येथील पिंक सिटी प्रेस क्लबमध्ये पत्रकारांसोबत बोलताना रामदास आठवले यांनी हे विधान केलं.
राहुल गांधींंच्या पंतप्रधान पदावर रामदास आठवलेंची भविष्यवाणी, वाचा नेमक काय म्हणाले आठवले
नेमकं काय म्हणाले आठवले ?
अयोध्येत मंदिर आणि मशीद दोन्हीही व्हायला हवे. तेथे राम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी भगवान बुद्धांचे मंदिर होते. आज जरी राम मंदिराच्या वादग्रस्त जागेवर खोदकाम केलं तरी तेथे बौद्ध मंदिराचे अवशेष सापडू शकतात.सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. पण त्या वादग्रस्त 60 एकर जागेपैकी 40 एकर जागा राम मंदिरासाठी मिळावी आणि 20 एकर जागा बाबरी मशिदीसाठी मिळावी.
भुजबळ ओबीसी समाजाचे लढवय्ये नेते; त्यांना प्लॅनिंग करून तुरुंगात टाकल- आठवले