सोशल मीडियावर आयशा टाकिया चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आयशा टाकियाची भरपूर चर्चा होत आहे. ही चर्चा कोणताही नवा सिनेमा किंवा नव्या गाण्यामुळे नाही तर ही चर्चा होतेय तिच्या प्लास्टिक सर्जरीमुळे. एकदा नाही तर अनेकदा प्लास्टिक सर्जरी केल्यामुळे तीचा चेहरा आता ओळखण्याजोगी देखील राहिला नाही. यापुर्वी 2004 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आयशाने लगेचच ब्रेस्ट इम्प्लान्टची शस्त्रक्रिया केली होती. या शस्त्रक्रियेमुळे ती चर्चेत आली होती. आयशाने स्वत: कधीही ही शस्त्रक्रिया केल्याचे मान्य केले नाही. मात्र तिचे फोटो याबद्दल बरेच काही सांगून गेले होते.
सध्या आयशा ट्विटरवर ट्रेंडिगमध्ये आहे. तिच्या प्लॅस्टिक सर्जरीमुळे तीला ट्रोल केलं जात आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, यावरून आयशाने आपल्या ओठांची सर्जरी केल्याचे स्पष्टपणे जाणवते. या सर्जरीमुळे आयशाची चेहऱ्यापट्टीत बदल जाणवतो. तीचे पाऊट आणि फेसकट पूर्णपणे बदलून गेल्याचेही स्पष्ट दिसून येत आहे. आधी आयशा क्यूट दिसायची. पण या सर्जरीनंतर तिचे ओठ चांगलेच जाड झालेले आहेत. त्यामुळे ती बरीच विचित्र दिसायला लागल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.