Share

MNS । “आव्हाड हे अफझल खानाचे प्रवक्ते”; मनसेचा जोरदार हल्लाबोल

MNS । मुंबई : माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) आणि ‘वेडात मराठे वीर दौडला सात’ (Vedat Marathe Veer Daudle Saat) या मराठी चित्रपटांना विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील आक्रमक झाले.  हर हर महादेव या चित्रपटाला विरोध म्हणून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री ११ वाजता ठाण्यात आंदोलन केले.

विशेष म्हणजे ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना बाहेर काढलं. कार्यकर्त्यांकडून प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर काढल्यानंतर काही प्रेक्षकांकडून मॅनेजरकडे तिकीटाचे पैसे परत देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मॅनेजर आणि काही प्रेक्षकांमध्ये बाचाबाची झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कृतीला मनसेने विरोध केला असून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अफझल खानाचे प्रवक्ते आणि मुंब्र्याचे नवाब संबोधत त्यांच्यावर टीका केली आहे.

त्याबरोबरच ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पडल्यानंतर प्रेक्षकांनी तिकिटाचे पैसे परत करण्याची मागणी केली त्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली असा आरोप खोपकरांनी केला आहे. यानंतर मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना बंद पाडलेला शो पुन्हा सुरु करा, अशी मागणी केली. त्यानंतर हा शो अविनाश जाधवांनी सुरु देखील केला.

जितेंद्र आव्हाड यांचा दावा काय?

“शिवाजी महाराजांच्या मांडीवरती अफजलखान झोपून आहे आणि त्याचा कोथळा फाडला आहे. हे इतिहासात कुठेच नाहीय,” असं आव्हाड म्हणाले. त्याचप्रमाणे ‘हर हर महादेव’ चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईचं दृष्य दाखवण्यात आलं असून त्यालाही आव्हाड यांनी विरोध केला आहे. “बाजीप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांशी लढायला गेले आहेत. हे कुठे दिसलं? बाजीप्रभूंनी शिवाजी महाराजांशी लढाई केली. बाजीप्रभू सच्चा सेवक होता शिवाजी महाराजांचा,” असं मत मांडत आव्हाडांनी या चित्रपटांना विरोध केला आहे.

MNS । मुंबई : माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) आणि ‘वेडात मराठे वीर दौडला …

पुढे वाचा

Entertainment Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now