चक्क! रस्त्यावर झाले विमान लँड, प्रीती झिंटाने केला व्हिडीओ शेअर

प्रीती झिंटा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अनेक व्हिडीओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच प्रीतिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका विमानाचे चक्क रस्त्यावर लँडिंग झाल्याचे दिसत आहे.

तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रीतिच्या समोर असलेल्या रस्त्यावर एक विमान लँड झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या विमानाच्या आजूबाजूला देखील अनेक लोक असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, ‘प्रत्येक गोष्ट ही नेहमीच पहिल्यांदा होत असते. मी कधी विचारही केला नव्हता की ड्राइव्ह करत असताना रस्त्यावर एखादे विमान लँड होताना दिसेल. देवाच्या कृपेने सगळे सुरक्षित आहे’.

प्रीति झिंटाने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. तिच्या सुंदरतेने आणि अभिनयाने तिने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भैयाजी सुपरहिट’ या चित्रपटात ती पाहायला मिळाली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून तिने सात वर्षांनंतर चित्रपटात काम केले होते.

महत्वाच्या बातम्या 

IMP