चक्क! भूक लागल्यामुळे हत्तीने खाल्ले हेल्मेट; पहा व्हिडिओ…

हत्ती

नवी दिल्ली : पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. यातच जंगल नष्ट होत असल्याची सध्याची स्थिती आपल्यालाला दिसत आहे. जंगलच नामशेष होत असल्याने जंगलात राहणारे प्राणी रस्त्यावर अनेकदा पाहायला मिळले आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. एका हत्तीला भूक लागल्याने चक्क त्याने हेल्मेट खाल्ले आहे.

या व्हिडिओमध्ये एक हत्ती रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या गाडीवरील हेल्मेट आपल्या सोंडेच्या मदतीनं खाली घेतो आणि यालाच आपलं भोजन समजून खाऊन घेतो. हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी प्रवीण अंगुसामी यांनी शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, कृपया कोणीतरी या भुकेल्या प्राण्याला सांगा, की हेल्मेट घातल्यानं जीव वाचतो, ते खाल्ल्यानं नाही.हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला आहे. हत्तीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP