एकदम झक्कास! अनिल कपूर यांचा व्हिडीओ पाहून चाहते झाले थक्क

अनिल कपूर

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.  वयाची ६० ओलांडल्यानंतरही तरूणाईला लाजवतील असा त्यांच्या चेहऱ्यावर जोश पाहायला मिळतो. सोशल मीडियावर ते प्रचंड सक्रीय असतात. नुकतेच त्यांनी फिट राहण्यासाठी घेत असलेल्या मेहनीतीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अनिल कपूरने हा व्हिडीओ शेअर करत टोक्यो ऑलिम्पिक कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ शेअर करताच फक्त चाहत्यांनीच नाही तर सेलिब्रेटी देखील कमेंट लाईक्स करताना दिसत आहेत. फराह खाननेही अनिल कपूरचे कौतुक करत म्हटले की, पाजी तुम्हाला तर टोक्यो ऑलिम्पिकमध्येच असायला हवे. असे अनेक कमेन्ट चाहत्यानी देखील  त्यांच्या या पोस्टवर केल्याचे पाहायला मिळते.

या वयातही अनिल कपूर यांची तब्येत एकदम झक्कास आहे. त्यांचा फिटनेस पाहून अनेक जण त्यांचे भरभरून कौतुक करतात. सधी त्यांच्या व्हिडीओला देखील अनेक लाईक आणि कमेन्ट येत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील थक्क झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP