कोरोना लसीकरण वाढवण्यासाठी सर्वस्तरांवर जनजागृती करणार : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Awareness will be spread at all levels to increase corona vaccination Says Collector Sunil Chavan

औरंगाबाद । महाराष्ट्रासह देशभरामध्ये कोरोना (कोव्हिड – 19) लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याबरोबरच शहरासह जिल्हाभरामध्ये लसीकरणाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी दिली.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यामध्ये लसीकरणाचे ध्येय 4900 होते. आतापर्यंत 2895 एवढेच लसीकरण होऊ शकले आहे. यावेळी 46 रोटेशन पूर्ण झाले आहेत. तर 100 रोटेशन होणे अपेक्षित होते. परंतु कोरोना लस घेतलेल्या 154 जणांना लसीकरण झाल्यानंतर छोटे-मोठे त्रास झाले, असल्याचेही चव्हाण यांनी या वेळी सांगितले.

शहरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. प्रत्येक केंद्रावर १०० लाभार्थ्यांना लस देण्याचे टार्गेट ठरवण्यात आले. मात्र, प्रतिदिन केवळ 50 ते 60 टक्केच आरोग्य कर्मचारी कोरोना लसीकरणाचा लाभ घेण्यास समोर येत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी कोरोना लसीकरणाबाबत कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले असून कोरोनाची लस घेतल्याने होणाऱ्या किरकोळ साईड इफेक्टमुळे घाबरून न जाण्याचे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या