अवयवदानाविषयी शाळांमधून प्रबोधन करण्याची आवश्यकता

सोलापूर : समाजामध्ये अवयवदान करण्यासंबंधी विविध गैरसमज, शंका आहेत. या शंकाचे शंकांचे होणे अवयवदानाला बळकटीकरण करण्यासाठी कार्यशाळेद्वारे प्रबोधन होणे गरजेचे आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मनातील शंका दूर झाल्यास ते सामान्य नागरिकांच्या मनातील शंका दूर करतील.

त्यामुळे अवयवदान चळवळ वाढीस लागण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी केले. डॉ. व्ही. एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्जरी विभाग वैद्यकीय संशोधन समितीतर्फे अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. सुनील घाटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी डॉ. किशोर इंगोले, डॉ. एस. जयस्वाल, डॉ. एस. गुंडेवाडी आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेत डॉ. एच. बी. प्रसाद यांनी ब्रेनडेड समजण्यासाठी कोण कोणत्या तपासण्या आवश्यक आहेत, या विषयी मार्गदर्शन केले. डॉ. मनोज डॉ. वैशाली पाटील यांनी हृदय प्रत्यारोपणावर मार्गदर्शन केले. डॉ. ऋत्वीक जयकर, डॉ. संतोष देशमुख, डॉ. प्रदीप कसबे, डॉ. दयानंद चवरे आदींनी परिश्रम घेतले. डॉ. ज्योतिका चवारिया डॉ. मयूरेश यांनी सूत्रसंचालन केले.