ग्वाल्हेर: हिंदू महासभेने ग्वाल्हेरच्या दौलतगंज येथील कार्यालयात गोडसे अभ्यास केंद्र सुरु केले होते. यावेळी महासभेच्या नेते जयवीर भारद्वाज यांनी नेहरू आणि जिन्ना यांचा उल्लेख करत गोडसेला योग्य असल्याचे सांगितले. या अभ्यास केंद्रात नथूराम गोडसेंच्या जीवनावरील पुस्तके असणार होती.
महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसेवर हिंदू महासभेच्या स्टडी सेंटर उघडल्यानंतर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटल होत कि, ‘ मला आनंद होत आहे की, ७० वर्षांनंतर बदलेल्या वैचारिक वातावारणात गोडसे सारख्या दोषींची बाजू मांडण्यासाठी कार्य केले जात आहे. नथुराम गोडसेला आनंद झाला असेल.’ अशी टीका तुषार गांधी यांनी केली होती.
त्यांनतर आता ग्वाल्हेर जिल्हा प्रशासनाने मंगळवारी हे सेंटर बंद केल असून येथील साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. कायदा-सुव्यवस्था कायम रहावी यासाठी जिल्हाप्रशासनाने ही कारवाई केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याच्या नावानं उघडलेल्या या वाचनालयामुळे परिसरात तणावाचं वातावरण परसलं होतं.
सोशल मीडियामध्ये गोडसे ज्ञानशाळा नावाने गंभीर संदेश पसरत होते. कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा दंडाधिका्यांनी परिसरात कलम १४४ लागू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे वाचनालय बंद करण्यात आलं, अशी माहिती ग्वाल्हेरचे पोलीस अधिक्षक अमित संघी यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट; चर्चेला उधाण
- आज पुन्हा इंधनदरवाढ मुंबईत पेट्रोलने केली नव्वदीपार !
- ‘मुस्लिम चार विवाह करतात मग धनंजय मुंडेंनी दोन केले तर काय बिघडलं?’
- कोरोना लसीकरणाची मनपाकडून जय्यत तयारी
- कोरोनाच्या ६० हजार लसी औरंगाबादेत दाखल, चार जिल्ह्यांचा साठा उतरवला