fbpx

अजित पवारांचे चिरंजीव निवडून येणार असतील तर त्यांना उमेदवारी द्यावीचं – आव्हाड

टीम महाराष्ट्र देशा: राजकारणामध्ये घराणेशाही वगेरे काही नसते, जो व्यक्ती निवडून येण्याची शक्यता असेल त्याला उमेदवारी द्यायला हवी, मग अजित दादा यांचे चिरंजीव पार्थ निवडून येणार असतील तर त्यांना उमेदवारी द्यावीचं असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस आ.जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र देशाच्या ‘कामाचं बोला’ या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

राजकारणामध्ये निवडून कोण येत हे पाहण गरजेचं असत. लोकसभेच्या जागा वाढवायच्या असतील तर निवडून येणाऱ्या व्यक्तीला संधी द्यावी लागते. पुण्याची जागा राष्ट्रवादी आपल्याकडे घेईल हे वाटत नाही. मात्र जर अजित पवार यांचे चिरंजीव एखाद्या जागेवरून निवडून येण्याची शक्यता असेल तर त्यांना उमेदवारी द्यायला हवी. राजकारणामध्ये घराणेशाही हा प्रकार नसतो. परंतु माझी मुलगी कधीही राजकारणात येणार नाही हे मी सांगतो.

दरम्यान, कल्याण लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून आव्हाड यांना विचारण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झाले होते. याबद्दल विचारला असता, ही बातमी खोटी असून पवार साहेब आणि माझी लोकसभे विषयी बोलणच झाल नाही, तसेच आजवर शरद पवार यांनी एकवेळही मी लोकसभा लढवावी असे सांगितलं नसल्याचं . आव्हाड यांनी स्पष्ट केल आहे.