‘शेतकऱ्यांच्या मुलांना ‘लावारीस’ म्हणणाऱ्या भाजप प्रवक्त्याच्या कानाखाली आवाज काढू’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सर्वच पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. तसेच राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त विधाने देखील केली जात आहेत. भाजप प्रवक्ते असणारे अवधूत वाघ यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची अवहेलना करणारे विधान केले असून, त्यामुळे वाघ यांच्यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

‘आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा… हागणारा नाही तर बघणारा लाजातो’ असे ट्विट वाघ यांनी केले आहे. ट्विटरवर ‘मराठा क्रांती वारियर’ नावाने चालणाऱ्या अकाऊंटच्या पोस्टला उत्तर देताना अवधूत वाघ यांनी हे विधान निर्लज्जपणे केले आहे.

Loading...

या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात प्रचारासाठी आलेले आमदार बच्चू कडू यांनी नेर येथे वाघ यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली. अवधूत वाघचा डीएनए तपासून बघितला पाहिजे, तो बहुधा पाकिस्तानचा असावा. त्याला आत्महत्येचे दु:ख आणि वेदना समजत नाही. तुमच्या (भाजपा) आणि काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते. निवडणुकीनंतर वाघ यांना त्यांच्या वक्तव्याचा जाब विचारू आणि तेव्हा त्यांना कानाखाली मारु, अशी धमकीच आ. कडू यांनी दिली.

आत्महत्या ग्रस्त शेतकरी ह्यांची मुलं परिस्थितीमुळे अनाथ झाली, त्यांना लावारीस म्हणून शेतकऱ्यांना अपमानित केले अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राजमुद्रेचा वापर केला तर कायदेशीर लढाई लढणार : विनोद पाटील