fbpx

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचा 11 वा अवतार’

टीम महाराष्ट्र देशा- भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या एका ट्वीटमुळे नवा वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत. भारताचे प्रधानमंत्री परम आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी हे विष्णूचा 11 अवतार आहेत , असं ट्वीट भाजप प्रवक्ते अवधुत वाघ यांनी केलं आहे. अवधुत वाघ महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते आहेत. विविध वृत्तवाहिन्यांवर ते भाजपची बाजू मांडत असतात. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

अवधूत वाघ यांनी यासंदर्भात एक मराठीत तर दुसरं इंग्रजी ट्विट केलं आहे. याशिवाय ‘यदा यदा ही धर्मस्य’ असं लिहित त्यांनी नरेंद्र मोदींना देखील एका ट्विटमध्ये टॅग केलं आहे.वाघ यांच्या पराक्रमाची सोशल मिडीयावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.