ऐतिहासिक निकाल देऊन दिल्लीकरांनी भारतीयाच्या मनातील संदेश दिला – अवधूत गुप्ते

blank

मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला घवघवीत यश मिळाले असून भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आहे. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा नवी दिल्ली मतदारसंघातून १९ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. विधानसभेच्या ७० जागांपैकी ‘आप’ने ६२ जागांवर विजय मिळवला. आता अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर महाष्ट्रातील नेत्यांनी त्याच प्रमाणे गायक-संगीतकार अवधूत गुप्तेनं देखील लक्ष्यवेधी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ऐतिहासिक निकाल देऊन दिल्लीकरांनी जणू प्रत्येक भारतीयाच्या मनातील संदेश दिला आहे,’ असे ट्विट गायक-संगीतकार गुप्तेनं केले आहे.

दरम्यान, दिल्ली निवडणूक निकालावर गुप्ते ट्विट करत म्हणाला, “असा ऐतिहासिक निकाल देऊन दिल्लीकरांनी जणू प्रत्येक भारतीयाच्या मनातील संदेश दिलाय की आम्हाला शाळा, रस्ते आणि महिलांची सुरक्षा हवीये. मंदिरं, मशिदी, पुतळे, कलमं आणि त्यावरुन कुठलाही वाद नकोय! अभिनंदन दिल्लीकर!