विविध मागण्यांसाठी रिक्षाचालक उद्यापासून बेमुदत संपावर

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकार कायम दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राज्यभरातील रिक्षाचालकांनी बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहील अस आटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने घेतला आहे.

रिक्षा चालक संघटनांनी विविध मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारला ८ जुलैपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. या अवधीपर्यंत जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही, तर ८ जुलैच्या मध्यरात्रीपासूनच राज्यभर बेमुदत बंद करण्याचा निर्णय आटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने घेतला आहे.

काय आहेत रिक्षा चालकांच्या मागण्या ?

  • ओला, उबरसारख्या अवैध टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करावी.
  • चालक-मालकांना पेन्शन, उपदान (ग्रॅज्युईटी), भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय मदत दिली जावी.
  • चार ते सहा रुपये भाडेवाढ करावी.
  • रिक्षाचालक-मालकांसाठी असलेले कल्याणकारी महामंडळ परिवहन खात्यांतर्गत असावे.
  • विमा कंपनीत भरण्यात येणारे पैसे तिथे न भरता कल्याणकारी महामंडळात जमा करावे.
  • जुन्या हकिम समितीच्या शिफारशीनुसार तातडीने रिक्षा भाडेवाढ करावी.
  • बेकायदा प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती करावी.