fbpx

कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाला २५१ धावांचे आव्हान

टीम महाराष्ट्र देशा (नागपूर) : भारत वि. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने कर्णधार विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाला २५१ धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात कोहलीने आपले कारकिर्दीतले ४० वे शतक ठोकले.

सामन्याचा सुरवातीलाच ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजाने  भारताच्या सलामीच्या फलंदाजांना लवकरच तंबूचा मार्ग दाखवला. पण विजय शंकर (४६) आणि कर्णधार विराट कोहली (११६) यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाला पुन्हा एकदा बळ मिळाले. शंकरच्या विकेट नंतर मात्र भारतीय संघ सर्वबाद झाला पण कर्णधार कोहलीने मात्र एक बाजू लावून धरत संघाला तारले.

या डावात ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज चांगलेच उजवे ठरले. या डावात कामिन्सने ४ , झॅम्पाने २ , तर कुल्टर नाईल , मक्स्वेल , लायन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. तर या डावात रोहित आणि एम एस धोनी मात्र शून्यावर बाद झाले.