भारताविरुद्ध लाजिरवाण्या परभावानंतर ऑस्ट्रेलियाच्या टीम पेनचं कर्णधारपदच धोक्यात ?

पेन

कॅनबेरा : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.

या कसोटी मालिकेतील पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनवर सडकून टीका करण्यात येत आहे. त्याचं कर्णधारपद धोक्यात आलं आहे. त्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट चाहत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने त्याची पाठराखण केली आहे.

“पेनने टीम इंडियाविरोधात सातव्या क्रमांकावर शानदार फलंदाजी केली. तो एक फलंदाज, विकेटकीपर आणि फलंदाज अशा तिन्ही भूमिका सार्थपणे पार पाडतोय. भविष्यात तो आणखी चांगली कामगिरी करेल”, असं म्हणत ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे सदस्य ट्रेवर हॉंस यांनी पेनची पाठराखण केली आहे.

महत्वाच्या बातम्या