ऑस्ट्रेलिया : सिडनी येथे सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 375 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर कांगारूंचा संघ प्रथम फलंदाजीला आला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत सहा विकेट्स गमावून 374 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून आरोन फिंच आणि स्टीव्ह स्मिथने शतकी खेळी खेळली.
यानंतर भारतीय संघ या धावांचा डोंगर गाठण्यासाठी मैदानात उतरला. सलामीला शिखर धवन व मयांक अग्रवाल उतरले. मात्र, २२ धाव करून मयांक अग्रवाल बाद झाला. तर, कर्णधार विराट कोहली देखील २१ धावांवर बाद झाला. शिखर धवनने एकाकी लढा सुरूच ठेवला. यानंतर, आलेला श्रेयस अय्यर देखील केवळ २ धाव तर केएल राहुल १२ धावांवर माघारी परतला.
त्यामुळे, मधल्या फळीची कांगारूंनी चांगलीच दाणादाण उडवल्याचे दिसून आले. मग मैदानात उतरला हार्दिक पांड्या. आयपीएलमधील फॉर्म कायम राखत हार्दिकने शिखर सोबत जरोदर फलंदाजी केली. त्यामुळे, निराशा झालेल्या भारतीय चाहत्यांमध्ये काहीशी आशा निर्माण झाली. यानंतर, शिखर धवन झम्पाच्या ओव्हरमध्ये झेलबाद झाला.
तरी देखील, पांड्याची बॅट तळपत होती. या मॅचमध्ये हार्दिक पांड्याने 90 रनची खेळी करत विक्रमाला गवसणी घातली. जगभरात सगळ्यात जलद एक हजार रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पांड्या पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पांड्याने 857 बॉलमध्ये एक हजार रन पूर्ण केले. हार्दिक पांड्याने हा रेकॉर्ड करताना जॉस बटलरला मागे टाकलं. बटलरने 860 बॉलमध्ये एक हजार रन केले होते.
हार्दिक पांड्याने सिडनी वनडेमध्ये 31 बॉलमध्येच त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर, जोरदार फटका त्याने लगावला मात्र सीमेच्या अलीकडेच स्टार्कने त्याचा झेल घेतला. यामुळे पांड्याला पुन्हा तंबूत परतावं लागलं. त्याचं शतक हुकल्याने अनेक चाहते निराश झाले. यासोबतच भारताच्या जिंकण्याच्या आशा देखील काहीशा धूसर झाल्या आहेत. पांड्याने ७६ चेंडूत ९० धावा बनवल्या. यामध्ये ४ षटकारांचा व ७ चौकारांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- आमचं ठरलंय : ‘या’ महापालिका निवडणुकांमध्ये आघाडी नाही; राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास ठाम!
- ‘माझा सामना, माझी मुलाखत’; हिंदुत्व असेल तर ते दिसत का नाही? : मनसे
- आधी छोटे नेते म्हणाले आणि आता चंद्रकांतदादांनी केलं शरद पवारांचं तोंडभरून कौतुक
- महाराष्ट्राला ड्रायव्हर नको तर मुख्यमंत्री हवा आहे; राणेंची तोफ धडाडली
- मविआच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी दाखल केल्याने ‘या’ नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी