ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम!

msd

सिडनी : भारताचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी हा जगातील सर्वात प्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आपल्या कारकीर्दीमध्ये अनेक विक्रमांची मजल मारली आहे. असाच एक विक्रम ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने निर्माण केला असून तिने चक्क धोनीला देखील मागे टाकलं आहे. ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक (विकेट किपर) एलिसा हिलीने विश्वविक्रम रचला आहे.

महेंद्रसिंग धोनीचा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील रेकॉर्ड तिने ब्रेक केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या महिला संघांमध्ये सद्या क्रिकेट मालिका सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने २-० ने टी-२० मालिका तर स्वतःच्या खिशात घातलीच या सोबतच एलिसाने धोनीचा टी-२० क्रिकेटमधील यष्टीरक्षक खेळाडू म्हणून सर्वाधिक बळी घेण्याचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

एलिसाच्या नावावर टी-२० मध्ये ४२ झेलबाद आणि ५० स्टंपिंगची नोंद केली आहे. तर धोनीची आतापर्यंत ५७ झेलबाद आणि ३४ स्टंपिंगची नोंद आहे. त्यामुळे एलिसाच्या नावावर आता एकूण ९२ तर धोनीच्या नावावर एकूण ९१ बादांची संख्या आहे.

महत्वाच्या बातम्या :-