आँस्ट्रेलियन ओपन : कँरोलिन वोजिनियाकी ने जिंकले कारकीर्दीतले पहिले ग्रँन्ड स्लँम

टीम महाराष्ट्र देशा : डेनमार्कच्या द्वितीय माणांकित कँरोलिन वोजिनियाकीने रोमानियाच्या अव्वल माणांकित सिमोना हेलेपचा पराभव करत २०१८ च्या आँस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.कँरोलिन वोजिनियाकीनेचे हे पहिले ग्रँन्ड स्लँम विजेतेपद आहे.त्याचबरोबर डेनमार्ककडून ग्रँन्ड स्लँमचे विजेतेपद मिळणारी ती पहिली टेनिपटू ठरली.

आँस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या महिला ऐकेरीचा अंतिम सामना अव्वल माणांकित हेलेप व द्वितीय माणांकित वोजिनियाकी यांच्यात होणार असल्याचे हा सामना नक्कीच रोमांचित होण्याची शक्यता होती.अपेक्षेप्रमाणे या कडव्या लढतीत वोजिनियाकीने बाजी मारली.तिने सिमोना हेलेपचा ७-६,३-६,६-४ आशा फरकाने पराभव करत कारकिर्दीतले पहिले ग्रँन्ड स्लँम मिळवले.

या दोन तासाहून जास्त वेळ चाललेल्या सामन्याच्या पहिल्या सेटमधे दोघांनीही तोडीची कामगिरी केली पण शेवटी वोजिनियाकीने हा सेट ७-६ आशा फरकाने जिंकला.दुसर्‍या सेट मधे दमदार पुनरागमन करत हेलेपने ६-३ आशा फरकाने हा सेट आपल्या खिशात टाकला.तीसर्‍या सेटमधे वोजिनियाकी पहिल्या सेटची पुनरावृति करत ६-४ अाशी आघाडी घेत आँस्ट्रेलियन ओपन स्पर्धेबरोबरच कारकिर्दीतले पहिले ग्रँन्ड स्लँम मिळवले.

या विजयाबरोबरच कँरोलिन वोजिनियाकी ने एटीपी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले.यापूर्वी वोजिनियाकीने २०१० साली एटीपी क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त केले होते.Loading…
Loading...