ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

indvsaus

सिडनी : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ तब्बल आठ महिन्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी आज मैदानात उतरणार आहे. मर्यादित 50 षटकांच्या तीन क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज सिडनी इथं होत आहे.

शुक्रवारपासून(२७ नोव्हेंबर) वनडे सामन्याने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात झाली. पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातून जवळपास ७ महिन्यांनी भारतीय संघ क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे.

या सामन्यात भारतीय संघाकडून शिखर धवन आणि मयंक अगरवाल हे सलामीला फलंदाजी करतील, असे कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले आहे. तर केएल राहुल मधल्या फळीत फलंदाजी करेल. तसेच यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळेल.दोन महिन्यांच्या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मर्यादित षटकांचे तीन सामने, तीन टी-ट्वेंटी सामने आणि चार कसोटी सामने होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या