fbpx

ऑस्ट्रेलिया संघ होणार मजबूत, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांची होणार ग्रँड एन्ट्री

टीम महाराष्ट्र देशा : ऑस्ट्रेलियाचे महत्वाचे फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ हे पुन्हा मैदानावर उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांच्यावर चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी १ वर्षाची ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून बंदी घालण्यात आली होती. पण आता या बंदीची मुदत संपत असल्याने पाकिस्तान – ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात हे दोन महत्वाचे फलंदाज आगमन करण्याची शक्यता आहे.

२२ ते ३१ मार्च या कालावधीमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ५ एकदिवसीय मालिका होणार आहे. ही मालिका संयुक्त अरब अमिराती येथे खेळण्यात येणार आहे. स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावरील बंदी २९ मार्चला संपणार आहे. त्यानुसार स्मिथ आणि वॉर्नर हे चौथ्या एकदिवसीय सामन्यात खेळणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान भारतात आत पुढच्या महिन्यात आयपीएल सिझन देखील सुरु होणार आहे. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांची आयपीएलमध्ये ग्रँड एन्ट्री होण्याची शक्यता आहे. आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया संघासाठी या दोन खेळाडूंच पुनरागमन महत्वाच ठरणार आहे.

1 Comment

Click here to post a comment