टीम इंडियाचा भीम पराक्रम,71 वर्षांत हे पहिल्यांदाच असं घडलं

टीम महाराष्ट्र देशा- ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर त्यांना कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा भीम पराक्रम टीम इंडियाने करून दाखवला आहे. 71 वर्षांत हे पहिल्यांदाच असं घडलं आहे. चौथी म्हणजेच सिडनी कसोटी पावसामुळे रद्द करण्यात आल्यानंतर टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. चेतेश्वर पुजाराला सामनावीराचा किताब देण्यात आला.

Loading...

भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक पहिल्या कसोटी मालिका विजयाचे श्रेय फास्ट बॉलरांना दिले आहे. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्राकार परिषदेत विराटने मालिका विजयात गोलंदाजांचा विशेषत: फास्ट बॉलरांचा मोलाचा वाटा आहे असे सांगितले.Loading…


Loading…

Loading...