अभिमन्यू पवार आणि बसवराज पाटीलांची लढत चुरशीची; मतदारराजा कोणाला देणार कौल ?

टीम महाराष्ट्र देशा : लातूर जिल्ह्यात ६ विधानसभा मतदारसंघ असून जिल्ह्यात ‘औसा’ मतदारसंघात अत्यंत लक्षवेधी लढत झाल्याने या बहूचर्चित मतदारसंघातून कोण ‘बाजीगर’ ठरणार याची राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. औसा विधानसभा मतदारसंघ या निवडणूकीपूर्वी तसा यूतीच्या जागा वाटपात शिवसेनेचा होता. परंतु या निवडणूकीत जागा वाटपात शेवटच्या क्षणी हा मतदारसंघ भाजपाला सोडवून घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले खासगी स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना काँग्रेसचे विद्यमान आ. बसवराज पाटील या तेल लावलेल्या पैलवानाच्या विरोधात आखाड्यात उतरविले.

भाजपने पवार यांना केवळ मैदानात उतरविले असे नव्हे तर औश्याची निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची केली. त्यामुळेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंञी अमित शाह यांनी या मतदारसंघातील किल्लारी या गावी जंगी सभा घेतली. भाजपाची किल्लारी येथे जंगी सभा होताच चाणाक्ष व मुरब्बी राजकारणी असलेले काँग्रेसचे आ.बसवराज पाटील यांनी देखील आपली राजकीय शक्ती पणाला लावून काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची औश्याला जंगी सभा घेतली. औश्याच्या या लढतीत अभिमन्यू पवार हे तसे फारच नवखे आहेत तर तुलनेत आ.बसवराज पाटील हे माञ फार अनुभवी व कसलेले उमेदवार आहेत.

Loading...

या मतदारसंघातून विजयाची हँटट्रीक करण्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. सूक्ष्म नियोजन व तगडी प्रचार यंञणेला आ.बसवराज पाटील यांना या लातूर जिल्ह्यात तरी तोड नाही असे खासगीत बोलले जाते. या पार्श्वभूमीवर औश्याच्या या लढतीमध्ये कमालीची चुरश निर्माण झाली आहे.

दरम्यान नवखे असलेल्या अभिमन्यू पवार यांनी देखील या निवडणूकीत राबविलेली यंञणा व घेतलेले कष्ट निश्चितच कौतुकास्पद असून त्यांनी आ.पाटील यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले असल्याचे राजकीय जाणकारांमधून बोलले जाते.

परिणामी औश्याच्या या राजकीय दंगलीकडे अख्या मराठवाड्याचे लक्ष लागून राहिले आहे. राजकीय विश्लेषकांना देखील या लढतीचा अंदाज करणे जिकरीचे होवून बसले आहे. काँग्रेस कार्यकर्ते आमची जागा येईल तर भाजपा कार्यकर्ते आमचीच जागा येईल असा जरी दावा करत असले तरी दोन्हीबाजूची धाकधूक माञ कायम असून आमचाच उमेदवार निवडून येइल असे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही अशी परिस्थिती सध्यातरी औसा मतदारसंघात पाहायला मिळते.

निलंग्याबाबत बोलायचं झालं तर विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर जिल्ह्यातील सर्वात सुरक्षित समजली जाणारी जागा म्हणजे भाजपाचे वजनदार नेते तथा पालकमंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यांची होय. संभाजीराव पाटील यांच्या विरोधात काँग्रेसने अशोकराव पाटील निलंगेकर यांना उमेदवारी दिली. संभाजीराव पाटील यांच्यासाठी हि निवडणूक सुरुवातीला तशी एकतर्फीच वाटत होती. तब्बल ५०-६० हजार मताधिक्याने संभाजीराव पाटील सहज विजयी होतील असे उघड बोलले जात होते.

दरम्यान मतदानाच्या अगोदरच्या ४-५ दिवसात या मतदारसंघातील चिञ माञ बदलल्याची जोरदार चर्चा या मतदारसंघात ऐकावयास येत असल्याने सुरुवातीला अतिशय सोपी असलेली हि निवडणूक संभाजीराव पाटील यांच्यासाठी शेवटच्या टप्प्यात तशी अवघड गेल्याने निकाल काय लागेल याची उत्सुकता लागली आहे. संभाजीराव पाटील यांच्याबाबतीत जे घडले तेच थोड्या फार फरकाने लातूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आ.अमितराव देशमुख यांच्या बाबतीत घडले असे म्हंटले तर तसे काही वावगे ठरणार नाही.

संभाजीराव पाटील यांच्या प्रमाणेच अमितराव देशमुख सहज विजयी होतील असे सुरुवातीला वाटत होते. परंतु भाजपाचे शैलेश लाहोटी यांनी शेवटच्या टप्प्यात आ.अमितराव देशमुख यांची चांगलीच दमछाक केल्याने लातूरच्या या लढतीत चांगली रंगत आली आहे. लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे धीरज देशमुख यांच्या कपाळी गुलाल निश्चितच असून ते नेमकं किती मताधिक्याने विजयी होतात याचे केवळ औत्सुक्य लागून राहिले आहे.

उदगीरमध्ये भाजपच्या विद्यमान आ.सुधाकर भालेराव यांचे तिकीट कापल्याने भाजपाची डोकेदुखी वाढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांचे तेथे पारडे जड दिसत आहे तर अहमदपूरमध्ये भाजपाचे बंडखोर उमेदवार दिलीप देशमुख यांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांचे पारडे शेवटच्या टप्प्यात जड दिसत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही उमेदवारांसाठी हि निवडणूक सोपी जाईल असे राजकीय जाणकारांकडून बोलले जाते.असे असले तरी या ६ मतदार संघातील निकाल काय लागतील यासाठी २४ आँक्टोबरची वाट पाहावी लागणार, हे माञ निश्चित !

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी