… अन् औश्यात अभिमन्यू पवार यांनी भेदले बसवराज पाटील यांचे चक्रव्यूह

टीम महाराष्ट्र देशा : औसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे मात्तब्बर नेते बसवराज पाटील मुरुमकर यांचा धक्कादायकरित्या पराभव करुन अभिमन्यू पवार यांनी औश्यातील पाटील यांचे राजकीय चक्रव्यूह भेदले !औसा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात प्रथमच अभिमन्यू यांच्या रुपाने भाजपाचे कमळ फुलण्याचा मोठा राजकीय करिश्मा या मतदारसंघात घडला आहे.

औसा मतदारसंघातून काँग्रेसकडून सलग दोनवेळा निवडून आलेले बसवराज पाटील मुरुमकर यावेळी विजयाची हँटट्रीक करण्यासाठी आपली राजकीय शक्ती पूर्णपणे पणाला लावली होती.काँग्रेस पक्षातील एक बडे प्रस्थ असलेले बसवराज पाटील यांचा लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय,सहकार,शैक्षणिक व सामाजिक क्षेञात मोठा दबदबा असल्यामुळे त्यांच्या औश्यातील राजकीय साम्राज्यला शह देणे तसे धाडसाचे व जिकरीचे होते.

Loading...

परंतु हि राजकीय किमया साधली आहे ती अभिमन्यू पवार नामक या भाजप कार्यकर्त्याने.आपल्या समोर बसवराज पाटील यांच्यासारखा बलाढ्य विरोधक आहे याची जाणीव ठेवून प्रचाराची यंञणा त्यांनी अत्यंत सक्षमपणे राबविली. मागील १० वर्षापासूनच्या पाटील यांच्या या राजकीय साम्राज्याला सुरुंग लावून त्यांचे निर्विवाद वर्चस्व अक्षरशः संपुष्टात आणले.

महायुतीत शिवसेनेकडे असलेला हा मतदारसंघ शेवटच्या क्षणी भाजपाला सोडवून घेवून बसवराज पाटील यांच्या विरोधात विधानसभेच्या आखाड्यात उतरलेले पवार केवळ आखाड्यातच उतरले नाहीत तर बसवराज पाटील यांची नियोजनबध्द व तगडी समजली जाणारी प्रचार यंञणा भेदून काढली.राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा,मतदारसंघात पवार यांच्यासाठी प्रचारात काम केलेला जिवाभावाचा मोठा मिञ परिवार,भाजपाबरोबरच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत,अभिमन्यू पवार यांची जिद्द व पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे मतदारसंघात त्यांनी केलेला प्रचार यामुळे निवडणूकी दरम्यान या मतदारसंघात पवार यांचे पारडे सुरुवातीपासूनच जड होते.

माजी आ.पाशा पटेल,माजी आमदार दिनकर माने,शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी आदींसह अनेक नेत्यांनी अभिमन्यू पवार यांच्या विजयासाठी घेतलेले विशेष परिश्रम .त्याचबरोबर अनेक जणांनी उघडपणे प्रचार न करता पडद्यामागून अदृश्य प्रचार जोरदारपणे कामाला लावल्याचा पवार यांना मोठा फायदा झाला. बसवराज पाटील यांच्या तुलनेत सरस प्रचार यंञणा राबवून युवा वर्गाला मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आकर्षित करण्यात पवार यशस्वी झाल्याने भाजपाच्या वातावरण निर्मीतीला याचा मोठा फायदा झाला.

बसवराज पाटील यांच्या विरोधकांना कँश करणे व मतदारांमध्ये आपला माणूस ही भावना निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हा भिडू आमदार नसताना ३-४ महिन्यात आपल्या मतदारसंघासाठी २५० ते ३०० कोटी रुपयाचा विकास निधी आणू शकतो तर तर आमदार झाल्यानंतर हा गडी किती निधी आणेल ? अशी एक भावना मतदारांमध्ये निर्माण झाली होती.ही भावना देखील पवार यांच्या पथ्यावर पडली.एकुणच राज्यात लक्षवेधी ठरलेल्या या लढतीत भाजपाच्या अभिमन्यू पवार यांनी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याचा पराभव करुन काँग्रेसचा अभेद्य समजला जाणारा औश्याचा गड सर केला आहे.या देदिप्यमान विजयातून औसा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर अभिमन्यू पवार यांनी एक नवा इतिहास निर्माण केला,असे म्हंटल्यास काही वावगे ठरणार नाही,हे माञ निश्चित !

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की