मुंबई : नॅथन लायनच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने गाले कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेला (AUS vs SL) गारद केले. श्रीलंकेने पहिल्या डावात २१२ धावा केल्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ३ गड्यांच्या मोबदल्यात ९८ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया आता श्रीलंकेपेक्षा ११४ धावांनी मागे आहे. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अवघ्या २५ धावा करून बाद झाला.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मार्नस लाबुशेनही १३ धावा करून बाद झाला. स्टीव्ह स्मिथ चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. डावाच्या २०व्या षटकात रमेश मेंडिस आला आणि पहिल्याच चेंडूवर उस्मान ख्वाजा आणि स्मिथ यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे स्मिथ ६ धावांवर धावबाद झाला. धावबाद झाल्यानंतर स्मिथ उस्मान ख्वाजावर चांगलाच रागावलेला दिसत होता.
Smith should have been more assertive and made the call as it was his to make but asked Khawaja to who cooked him, shouldn’t have had to cook him though as wasn’t his call pic.twitter.com/LDsqsddCEH
— james (@james2536828) June 29, 2022
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर श्रीलंकेची फलंदाजी झुंजताना दिसली. संघाला पहिला धक्का ३८ धावांवर बसला. त्याचवेळी संघाची धावसंख्या ४२ धावांवर असताना कुसल मेंडिसही बाद झाला. कर्णधार करुणारत्नेलाही विशेष काही करता आले नाही आणि तो २८ धावा करून बाद झाला. संघाच्या ४ फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही. लंकेचा संपूर्ण संघ ५९ षटकात २१२ धावा करत सर्वबाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<