मुंबई : श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना गाले येथील मैदानावर खेळला जात आहे. खराब हवामानामुळे सामना वेळेवर सुरू झाला नाही. गालेतील वादळ आणि पावसाचा जोर इतका होता की स्टेडियमचा एक स्टँड उन्मळून पडला. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा स्टँडवर कोणीही उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, गालेमध्ये खेळ सुरू होण्याच्या सुमारे ९० मिनिटे आधी जोरदार वादळ आणि पाऊस सुरू झाला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होणार होता. पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे मैदानावरील कर्मचाऱ्यांना आऊटफिल्ड झाकण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. वेळ वाया गेला असला तरी या सामन्यात निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण १३ विकेट पडल्या होत्या. त्यामुळे सामन्यात पुरेशी षटके टाकली तर निकाल येऊ शकतो. या सामन्यात श्रीलंकाचा संघ ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजासमोर झुंजताना दिसला आहे.
कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बुधवारी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. श्रीलंकेचा संपूर्ण संघ २१२ धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलिया संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज नॅथन लायनने २५ षटकांत ९० धावा देत ५ बळी घेतले. त्याचवेळी युवा लेगस्पिनर मिचेल स्वॅपसननेही लंकेच्या ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. कमिन्स आणि स्टार्क यांना १-१ गडी बाद करण्यात यश मिळाले. श्रीलंकाचा संपूर्ण संघ ५९ षटकांत सर्वबाद झाला.
Situation now at Galle #SLvsAUS pic.twitter.com/4NBbulUEQn
— Anjana Kaluarachchi (@Anjana_CT) June 30, 2022
यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात फारशी खास झाली नाही. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर २५ धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मार्नस लबुशेनही १३ धावा करून परतला. संघाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ वैयक्तिक ६ धावांवर धावबाद झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ झाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३ बाद ९८ अशी होती.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<