औरंगाबादच्या कचराकुंडीने येणाऱ्या उद्योगांच्या ‘नकातील केस जळाले’

garbage-aurangabad

अभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार) औरंगाबाद : गेल्या काही वर्षांपासून औरंगाबादच्या विकासाचा वेग मंदावला आहे. त्यात जातीय तणावाचे शहर म्हणून झालेली ओळख कुठे पुसतो तर औद्योगिक अशांततेच्या शहरांच्या यादीत समावेश झाला, त्यातून कुठे बाहेर पडलो तर पाण्याच्या टंचाईमुळे उद्योगांनी या शहराला नापसंत केले. आता तर कचऱ्याच्या वासाने येऊ घातलेल्या उद्योगांच्या ‘नकातील केसही जाळले’.

garbage-aurangabad
औरंगाबाद शहराच्या विकासाच्या गप्पा मारण्याचा अधिकार इथल्या लोकप्रतिनिधींना नाही, फक्त डाॅ. रफिक झकेरिया वगळता. कारण त्यांनी या शहरात एमआयडीसी आणण्यात महत्वाची भुमिका निभावली होती. त्यानंतर या शहराचे औद्योगिकीकरण करण्यात महत्वाचा वाटा हा ओ.आर.एम.बागलांचा आहे. या शहरात असणाऱ्या पायाभूत सुविधा पाहून इथे उद्योगांनी आपले बस्तान बसविले. पण सुरवातीला राजकारण्यांनी या शहरात जातीय तणाव वाढविला. त्यामुळे  शहराच्या विकासाला खिळ बसली. त्यातून या शहराचे तोडगा काढला आणि त्यातून जातीय तणाव कमी होऊ लागले. पण त्यामुळे शहर दहा वर्षांनी मागे गेले. त्यानंतर पैठण एमआयडीसीत अॅरीस्ट्रो क्रॅश कंपनी व्यवस्थापक पुरींचा खून झाला. त्यामुळे हे शहर औद्योगिक अशांत शहरांच्या यादीत गेले. त्यावेळी ज्या उद्योगांनी इथे येण्याचे निश्चित केले होते. त्या उद्योगांनी दूसऱ्या ठिकाणी आपले प्रकल्प सुरू केले. त्याचीही मोठी किंमत या शहराला चुकवावी लागली. त्यानंतर ही या शहरात उद्योग आले नाहीत, असे नाही. पण ज्यांनी हे उद्योग सुरू केले. त्यांना पाणी टंचाईला समोरे जावे लागले. उद्योगांच्या पाण्याची कपात करून शहराची तहान भिजवावी, म्हणून हा खटाटोप केला. त्यात कमी पाण्याचा वापर करून बिअर तयार करणाऱ्या कारखान्याने आपला मोर्चा अन्य ठिकाणी हलवावा लागला. बिअर हब असणाऱ्या या शहराकडे बिअर उत्पादन करणाऱ्या उद्योगांनी पाठ फिरवली.

Loading...

garbage-aurangabad
औरंगाबादच्या कचऱ्याने जागतिक पातळीवर ‘कचरा’ केला आहे. त्यामुळे  ज्या उद्योगांना या शहरातील पायाभूत सुविधा आणि औद्योगिक वातावरणाने भुरळ घातली होती. त्या उद्योगांपर्यत 19 दिवसांपासून साचलेल्या कचऱ्याचे फोटो पोहोचले. ते फोटो पाहूनच त्यांच्या ‘नकातील केस जळाले’. त्यामुळे हा कचरा औरंगाबाद शहराला आणखी किती कचऱ्यात ढकलतो ते काळच सांगेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
मंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
मशिदींना हात लावल्यास रिपब्लिकन पक्ष मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील - रामदास आठवले