fbpx

औरंगाबादचा पराभव हा फक्त खैरेंचाच नाही तर माझा सुद्धा पराभव आहे – उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबाद लोकसभेतला पराभव फक्त चंद्रकांत खैरेंचा झालेला नाही. तर तो माझा म्हणजे उद्धव ठाकरेंचा झालाय, असं भाष्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पण आम्ही पराभवाने शांत बसणारे नाहीत. आम्ही पुन्हा एकदा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निकाल लागल्यानंतर सामनाच्या अग्रलेखातून देखील, ‘…तर संभाजीनगरवर हिरवं फडकं कधीच फडकलं नसतं’, अशी जहरी टीका आणि पराभवाची खंत व्यक्त केली होती.

दरम्यान, चंद्रकांत खैरे तुम्ही काळजी करू नका, पुढचा विजय आपला आहे, असा विश्वास त्यांनी खैरेंना दिला. तर औरंगाबादचा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. कालच मी पराभव पाहण्याच्या अगोदर मेलो का नाही, असं वक्तव्य माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खैरेंच्या पराभवावर भाष्य केलं आहे.